दिर्घ कथा लेखन स्पर्धा...
डिसेंबर व जानेवारी...२०२५-२०२६
डिसेंबर व जानेवारी...२०२५-२०२६
"काय माझा गुन्हा...?" भाग ४७
पुण्यातील पुढचे लग्नानंतरचे दिवस,
गौरवीचे दिवस आनंदात जाऊ लागले…
साधं घर… मर्यादित साधनं… पण मनात समाधान होतं…
साधं घर… मर्यादित साधनं… पण मनात समाधान होतं…
ती अभ्यास करत होती… आणि माधव कामावर जात होता…
दर रविवारच्या सुट्टीत दोघेही बाहेर फिरायला जात... आणि रात्री उशिरा येताना हॉटेलमध्येच जेवण करत...
दर रविवारच्या सुट्टीत दोघेही बाहेर फिरायला जात... आणि रात्री उशिरा येताना हॉटेलमध्येच जेवण करत...
गौरवी सुद्धा माधवला सकाळचा नाश्ता आणि टिफिन बनवून देत असे...
आणि दिवसभर घरातील कामे आवरुन ती आपला अभ्यास करत असे...
आणि दिवसभर घरातील कामे आवरुन ती आपला अभ्यास करत असे...
कधी कधी तीला घरची आठवण यायची… आणि मग तीला आपल्या आईचा चेहरा आठवायचा… आणि मग ती फोन उचलून आपल्या आईला फोन लावण्यासाठी मोबाईलवर नंबर डायल करण्याचा प्रयत्न करायची... तेव्हा ती स्वतःला सावरायची… आणि स्वतःलाच उद्देशून बोलायची...
“मी माझा निर्णय स्वतः घेतलाय… त्यामुळे मुंबईतील थोडं वातावरण गरम असणारं... अजून काही दिवस जाऊ दे... मग मी स्वतःच आईला फोन करेन... आणि समजावून सांगेन..." हे ती स्वतःला सतत सांगत राहायची…
“मी माझा निर्णय स्वतः घेतलाय… त्यामुळे मुंबईतील थोडं वातावरण गरम असणारं... अजून काही दिवस जाऊ दे... मग मी स्वतःच आईला फोन करेन... आणि समजावून सांगेन..." हे ती स्वतःला सतत सांगत राहायची…
काही महिन्यांनी…
एका संध्याकाळी माधव घरी आला आणि म्हणाला...
“गौरवी… मला एक नवीन प्रोजेक्ट मिळालाय…”
एका संध्याकाळी माधव घरी आला आणि म्हणाला...
“गौरवी… मला एक नवीन प्रोजेक्ट मिळालाय…”
तीला खूप आनंद होतो...
"पण…”
तो थोडा थांबतो… आणि ती त्याच्याकडे आनंदाने पाहत असते…
तो थोडा थांबतो… आणि ती त्याच्याकडे आनंदाने पाहत असते…
पण तो काहीच बोलत नसल्याने गौरवी त्याला विचारते...
"पण... काय माधव...?"
"पण... काय माधव...?"
“प्रोजेक्ट मुंबईचा आहे... त्यामुळे माझी बदली सुद्धा मुंबईला होणार आहे…”
क्षणभर दोघंही गप्पच होतात...
कारण मुंबई म्हणजे तीच मुंबई आहे... जिथून ते दोघेही पळून आले होते…
पण यावेळी ते पळणार नव्हते… तर ते परत जाणार होते…
“आपण जाऊया…”
गौरवी शांतपणे म्हणाली…
“आता आपलं नातं कायदेशीर आहे… आणि आपण एकत्र आहोत…”
गौरवी शांतपणे म्हणाली…
“आता आपलं नातं कायदेशीर आहे… आणि आपण एकत्र आहोत…”
माधव तिच्याकडे पाहतो… त्याच्या डोळ्यांत तीच्यासाठी अभिमान असतो…
काही दिवसांनी माधव आणि गौरवी निघायची तयारी करायला सुरुवात करतात...
माधव तिच्या मागून येतो… आणि बॅग खाली ठेवतो… व तिच्या हातातली बॅग घेतो…
“जड झाली आहे…” तो म्हणतो…
“जड झाली आहे…” तो म्हणतो…
गौरवी त्याच्याकडे पाहते…
“सामान नाही… आठवणी जड आहेत…”
“सामान नाही… आठवणी जड आहेत…”
माधव काही बोलत नाही…
फक्त तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन ठेवतो…
फक्त तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन ठेवतो…
“मुंबई आपल्याला पुन्हा तपासणार आहे…”
तो म्हणतो…
तो म्हणतो…
गौरवी शांतपणे उत्तर देते…
“पण यावेळी आपण पळात नाहीय… तर आपण उभं राहायला जातोय…”
“पण यावेळी आपण पळात नाहीय… तर आपण उभं राहायला जातोय…”
दोघंही घराकडे शेवटची नजर टाकतात…
त्या भिंती… ती शांतता… तो संघर्ष… आणि मग... दार बंद होतं…
त्या भिंती… ती शांतता… तो संघर्ष… आणि मग... दार बंद होतं…
पण यावेळी कोणतंही स्वप्न मागे राहत नाही… सगळं सोबत घेऊनच ते निघतात…
माधव आणि गौरवी कपड्यांच्या दोन बॅगा… काही भांडी... गरजेच्या वस्तू आणि कागदपत्रे... व अजून बरच काही... आणि महत्वाचं म्हणजे थोडी स्वप्नं.. आणि खूप जबाबदाऱ्या घेऊन
दोघेही मुंबईकडे रवाना होतात…
दोघेही मुंबईकडे रवाना होतात…
क्रमशः....
©® प्राची कांबळे (मिनू)
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा